ठाकुर्ली (डोंबिवली) येथे महिला पोलीस हवालदाराला घायाळ करण्याचा दुचाकीस्वाराचा प्रयत्न !

पोलिसांचे भय आणि कायद्याचा धाक उरला नसल्याचे दर्शवणारी घटना !

ठाणे, १३ डिसेंबर (वार्ता.) – ठाकुर्ली (पूर्व) येथील रेल्वेस्थानक भागातील हनुमान मंदिर-चोळे रस्त्यावर पोलीस हवालदार रेणुका राठोड या वाहतूक नियोजनाचे काम करत होत्या. १२ डिसेंबरला सकाळी भरधाव असलेल्या एका दुचाकीस्वाराला त्यांनी रोखले असता त्याने दुचाकी वेगाने पुढे नेली. दुचाकी पुढे जातांना ती महिला हवालदाराच्या पायावरून गेली; पण तरीही राठोड यांनी दुचाकीची मागील बाजू पकडून चालकाला रोखले. तेवढ्यात पादचारी आणि विक्रेते तेथे जमा झाले. वरिष्ठांना माहिती देऊन दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई करून तेथून सोडण्यात आले. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. – संपादक)