नाशिकमध्ये भ्रदकाली परिसरात अल्पसंख्यांकाडून अवैध धंदे चालू ! – आमदार नीतेश राणे, भाजप
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – नाशिक येथी भ्रदकाली परिसरात अल्पसंख्यांक समाजाकडून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. शटर बंद करून रात्री उशिरापर्यंत अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दूरध्वनी केला, तसेच व्हिडिओचे पुरावेही पाठवले आहेत.
पुरावे देऊनही या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही. हा विषय भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत उपस्थित केला.