युक्रेन युद्धात रशियाच्या ३ लाख १५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेच्या वृत्तपत्राचा दावा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आतापर्यंत रशियाच्या ३ लाख १५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाच्या वृत्तात करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी २०२२ पासून हे युद्ध प्रारंभ झाले असून त्या वेळी या युद्धात रशियाकडून ३ लाख ६० सहस्र सैनिक सहभागी झाल्याचे म्हणजे ८७ टक्के सैनिक ठार झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
सौजन्य catty news
या वृत्तात पुढे म्हटले आहे की, या युद्धामुळे रशियाच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या राष्ट्रपती पुतिन यांच्या प्रयत्नांना १५ वर्षांनी मागे टाकले आहे. ही हानी भरून काढण्यासाठी रशिया त्याच्या सैन्यात मुक्त झालेल्या बंदीवानांची भरती करून त्यांना युद्धासाठी पाठवत आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच ठाऊक असल्याने आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने असल्याने या आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा, हे जगाला ठाऊक आहे ! |