यात्रेच्या फलकावर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापल्याप्रकरणी कर्मचार्यावर गुन्हा नोंद !
भिवंडी येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा
ठाणे, १२ डिसेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती आणि काल्हेर ग्रामपंचायत यांच्या वतीने काल्हेर येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंचावरील फलकावर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापण्यात आले होते. यावरून प्रशासनावर टीका झाली. या प्रकरणी फलक बनवणार्या ‘गुरुदत्त एंटरप्रायझेस’चे कर्मचारी अलंकार पाटील यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रीय गौरव अपमान अधिनियमांतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.