सोलापूर बसस्थानकातून बार्शीला जाणार्या गाड्यांचा तुटवडा !
प्रवाशांचे हाल
सोलापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – सोलापूर बसस्थानकातून बार्शी येथे जाणार्या गाड्यांचे नियोजन बारगळल्याने सोलापूर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रतिदिन सोलापूर-बार्शी प्रवास करणार्यांची संख्या पुष्कळ आहे. पूर्वी प्रतिघंट्याला बार्शीला जाणारी बस उपलब्ध होत होती; मात्र मागील काही दिवसांपासून या गाड्यांचे नियोजन बारगळल्याने बार्शीकडे जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. (प्रवाशांची संख्या पाहून बसगाड्यांचे नियोजन का केले जात नाही ? नागरिकांची सोय पहाणारे प्रशासन हवे ! – संपादक)