पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण !
पुणे – तक्रारीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी उद्धट वर्तन करून पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याची घटना येरवडा पोलीस ठाण्यात घडली. महिला पोलीस निरीक्षकांचीही कॉलर पकडून त्यांना धमकावण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मनोज महाले, दीपाली महाले आणि राधेय महाले यांना अटक केली. पोलीस ठाण्यातील शिपाई सोमनाथ भोरडे यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. निखिल गुरव यांच्या तक्रारीची पूर्तता करण्यासाठी मनोज महाले याला बोलावण्यासाठी फिर्यादी पोलीस गेले असता महाले यांनी त्यांच्या समवेत उद्धट वर्तन केले. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांचा धाक न उरल्याचे हे द्योतक आहे. पोलीस याविषयी आत्मपरीक्षण करतील का ? |