संस्कृत भाषेचे सौंदर्य
मनुस्मृतीने केलेला मातेचा गौरव
मनुस्मृतीने मातेचा पुष्कळ गौरव केला आहे. स्त्री-मुक्तीवाद्यांनासुद्धा स्त्रीचा एवढा गौरव करता येणार नाही !
उपाध्यायान्दशाचार्य आचार्याणां शतं पिता ।
सहस्रं तु पितॄन्माता गौरवेणातिरिच्यते ॥
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १४५
अर्थ : उपाध्यक्षापेक्षा आचार्य दशपट श्रेष्ठ, आचार्यापेक्षा पिता शतपट श्रेष्ठ आणि पित्यापेक्षा माता गौरवात सहस्रपटींनीे श्रेष्ठ असते.
मनूने स्त्रीच्या स्वातंत्र्यापेक्षा तिच्या संरक्षणाला अधिक महत्त्व दिलेले असणे
स्त्रीला एकाकी न ठेवता पिता, बंधु, पति आणि पुत्र यांपैकी कोणाच्या तरी संरक्षणाखाली ठेवणे आवश्यक असते.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमहर्ति ॥
– मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३
अर्थ : लहानपणी पिता, तारुण्यात पती आणि म्हातारपणी पुत्र स्त्रीचे रक्षण करत असल्याने तिला संरक्षणाविषयी स्वातंत्र्याची आवश्यकता नाही.
‘स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही’, याचा अर्थ ‘त्या स्वातंत्र्यास पात्र नाही’, असा केला जातो; पण याचा तो अर्थ चुकीचा आहे. इथे ‘स्त्रीला एकाकी स्वतंत्र न ठेवता पिता, बंधू, पती आणि पुत्र यांच्यापैकी कोणाच्या तरी संरक्षणाखाली ठेवावे’, असे सांगितले आहे. असा समाज कितीही पुढारला तरी स्त्रीला एकटे रहाणे शक्य आहे का, तिचे रक्षण करणे आवश्यक आहे; म्हणून मनूचे वचन सार्थ आणि योग्य आहे.