माझी आध्यात्मिक माऊली पू. (सौ.) अश्विनीताई ।
माझी आध्यात्मिक माऊली पू. (सौ.) अश्विनीताई ।
आहे प्रेमळ अन् चैतन्याची साउली ।। १ ।।
आहे मी अपराधी जरी, तरी प्रत्येक वेळी मज क्षमा करी ।
आहे आम्हा लेकरांवर (टीप १) अपार तिची प्रीती ।। २ ।।
तुझी उतराई मी होऊ तरी कशी ?
अध्यात्मात उंच भरारी घेण्यासाठी ।
साधनेच्या या पंखांना सदोदित
सत्संगरूपी बळ तूच देशी ।। ३ ।।
तुझ्या या सत्संगरूपी चैतन्याचा
लाभ आम्हाला भक्तीरूपाने घेता येऊ दे ।
प्रत्येक क्षणी गुरुदेवांच्या चरणी
या देहाला लीन होता येऊ दे ।। ४ ।।
तुम्ही माझी आई मी लेक तुमची,
ही तुमची प्रीती मी सदोदित अनुभवते ।।
तुमच्या परम पावन कोमल चरणी
कृतज्ञतेची पुष्पे मी अर्पिते ।। ५ ।।
पू. अश्विनीताई, माझे तुमच्या पावन कोमल चरणी साष्टांग नमन !
टीप १ : सर्व साधकांवर
– कु. शुभांगी वसंतराव आचार्य, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |