JNU : जे.एन्.यू. परिसरात आंदोलन, हिंसा आदी करणार्या विद्यार्थ्यांना होणार २० सहस्र रुपयांचा दंड !
सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्यांची होणार हकालपट्टी !
नवी देहली – जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (जे.एन्.यू.च्या) प्रशासनाने नव्याने केलेल्या नियमानुसार विश्वविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी हिंसा, आंदोलन, उपोषण आदी कृत्य केल्यास त्यांना २० सहस्र रुपयांचा दंड, तसेच राष्ट्रविरोधी आणि जात अन् धर्म विरोधी घोषणाबाजी करून चिथावणी दिल्यास १० सहस्र रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याखेरीज विश्वविद्यालयाच्या प्रशासनाच्या अनुमतीविना परिसरात एखादा कार्यक्रम आयोजित केला, तर ६ सहस्र रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असण्यासाठी हा नियम बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यातही विद्यार्थी सातत्याने या नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांची विश्वविद्यालयातून हकालपट्टी केली जाणार आहे.
प्रशासनाने परिसरात २८ प्रकारचे कार्यक्रम आणि कृती यांवर बंदी घातली आहे. यांत जुगार खेळणे, प्रशासनाच्या कार्यात अडथळे निर्माण करणे, वसतीगृहातील खोल्यांवर बेकायदेशीर नियंत्रण ठेवणे, अपमानकारक भाषेचा वापर करणे, फसवणूक करणे आदींचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाशिक्षण घेण्याऐवजी अशा प्रकारची कृत्ये करणार्या विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या पालकांना जाणीव करून देण्यासाठीही विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक ! |