रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. दशरथ कलाल

अ. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये गुरुतत्त्व असल्यामुळे प्रत्येक वस्तूकडे आदराने पहावे.

आ. आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

इ. वेळेचे पालन करणे, प्रत्येक वस्तूप्रती भाव ठेवणे, सकारात्मक विचार करणे, प्रत्येकात गुरुतत्त्व पहाणे, प्रत्येक वस्तूचा सदुपयोग करणे, हे सर्व मला आश्रमात शिकायला मिळाले.

ई. कोणतेही कार्य लहान किंवा मोठे नसते. प्रत्येक कार्य श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक केले पाहिजे. प्रत्येक कृती करतांना ‘गुरुदेव, हे कार्य तुम्हाला अपेक्षित असे करवून घ्या, मी केवळ निमित्त आहे’, अशी प्रार्थना करून केल्यास त्या कृतीतून आनंद मिळतो.

२. अनुभूती

२ अ. सेवेतून थकवा न येता आनंद मिळणे : आश्रमातील चैतन्यामुळे सेवा करतांना मला थकवा येत नव्हता. ‘अजून सेवा करावी’, असे मला वाटत होते. ‘या आश्रमात सेवा करण्याचे भाग्य मला लाभले’, हे माझे पूर्वसुकृतच आहे. मला प्रत्येक सेवेतून आनंद मिळत आहे.

२ आ. ध्यानमंदिरात नामजप करतांना माझे मन एकाग्र होऊन नामजपातून बाहेर पडण्यास सिद्ध होत नाही.

२ इ. ‘आश्रमात प्रत्येक श्वास घेतांना त्यातून गुरुदेवांचे चैतन्य शरिरात घेत आहे’, अशी मला अनुभूती आली.’

– श्री. दशरथ मानाजी कलाल, हुब्बळ्ळी, धारवाड, कर्नाटक. (२.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक