रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती विमल आगवणे (वय ६६ वर्षे) यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘एकदा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारले. ते उपाय करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. त्यानंतर एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सत्संग लाभला. मी त्यांना सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेला नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती सांगितल्या.

श्रीमती विमल आगावणे

१. वैयक्तिक अनुभूती

अ. ‘मी रात्री झोपल्यावर ‘देव माझ्या जवळ आहे’, असे मला वाटते.

आ. ‘कुणीतरी माझ्याजवळ असून माझ्या पाठीवर स्पर्श करत आहे आणि ‘तो स्पर्श चांगला आहे’, असे मला जाणवते.

इ. मी रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचा आढावा देवाला देते. त्यामुळे मन शांत राहून मला पहाटे ५.३० वाजता जाग येते.

२. सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

अ. मी धान्य निवडण्याची सेवा करते. सकाळी ६ वाजता सेवेच्या ठिकाणी गेल्यावर तेथील दार उघडतांना आणि सेवेला आरंभ करण्यापूर्वी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करतांना मला आनंद होतो. रात्री सेवा संपवून दार बंद करतांनाही मला आनंद होतो. उद्या ‘देवीला भेटायला कधी येते’, असे मला वाटते.

३. पालट

३ अ. शिकण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी कुणी माझी चूक सांगितली, तर मला राग यायचा. आता कुणी माझी चूक सांगितली, तर ‘त्या चुकीतून शिकायचे आहे’, असे मला वाटते आणि मला शिकण्यातील आनंदही मिळतो.

आता सत्संगात बसल्यावरही ‘काय सांगायचे ?’, हे मला कळत नव्हते; पण प्रार्थना केल्यावर मला योग्य प्रकारे बोलता आले. तेव्हा प.पू. डॉक्टर ‘चांगले आहे’, असे मला म्हणाले.’

– श्रीमती विमल आगावणे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक