गुरुदेवांच्या चरणांशी जीवन पावन झाले ।

सौ. शकुंतला बद्दी

सनातनी विद्यालयी आले ।
गुरुदेवांची मी हो झाले ।।
परमात्म्याच्या चरणांशी ।
जीवन पावन झाले ।। १ ।।

मायासागरी अडकली
होती जीवन नौका ।
बुडण्याचा होता सतत धोका ।।
नावाडी बनून तुम्ही येता ।
ही नाव रामनाथीला वल्हवून नेता ।। २ ।।

नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती ।
शिकवुनी करता देवा, अनंत उपकार साधकांवरती ।।
अपराधी आम्ही फार, तरी धरला हात आमचा देवा ।
चरणांशी नेऊनी तुमच्या दिला आनंदाचा मेवा ।। ३ ।।

स्वभावदोषांना पळवून लावता ।
हृदयसिंहासनी येऊनी विराजता ।।
दैवी सुख अनुभवतो आता ।
काय गाऊ तुमच्या कृपेची गाथा ।। ४ ।।

आत्मज्योत जागृत करूनी ।
दिले ज्ञान भरभरूनी ।।
कसे फेडू सांगा हे उपकार ।
अल्पबुद्धीची या अल्प भक्ती करा तुम्ही स्वीकार ।। ५ ।।

काही नाही उरले आता ।
जाणिले तूच माझा जीवन दाता ।।
पार करते हा मायासागर ।
तुझ्या कृपेने हे गिरिधर ।। ६ ।।

– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई. (१२.४.२०२२)