भारतीय रिझर्व बँकेकडून ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित !
नवी देहली – देशात १० रुपयांच्या नाण्यांव्यतिरिक्त १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि २० रुपये यांची नाणी चलनात आहेत. ही सर्व नाणी भारतीय रिझर्व बँकेकडून चलनात आणण्यात आली असून ती वैध आहेत. कुणीही ही नाणी खोटी संबोधून ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. भारतीय रिझर्व बँकेनुसार, केवळ २५ पैसे किंवा त्यापेक्षा अल्प किमतीच्या नाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ५० पैशांची नवीन नाणी चलनात आणली जात नाहीत; परंतु ती अद्याप चलनात आहेत आणि कुणीही ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.
१० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणार्याविरुद्ध पोलिसांत करता येते तक्रार !कोणत्याही व्यक्तीने किंवा दुकानदाराने १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवता येते आणि त्याला कडक कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागू शकते. |