मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !
|
हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदु संघटनांनी शाळेबाहेर निदर्शने केल्यानंतर शिक्षक महंमद अदनान याला बडतर्फ करण्यात आले आहे. याखेरीज शाळेच्या प्रशासनाने लेखी क्षमापत्र प्रसारित केले आहे. ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ ही शाळा अलीगडच्या ‘नूरुल उलूम एजुकेशन सोसायटी’कडून संचालित केली जाते.
या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये गजेंद्र सिंह सिसोदिया, जो विद्यार्थ्याचा भाऊ आहे, ज्याच्या संदर्भात वरील घटना घडली. यात गजेंद्र सिंह याने सांगितले की, त्याचा भाऊ शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असतांना त्याने शिक्षक महंमद अदनान यांना ‘राम राम’ म्हटले. यावर ते काही म्हणाले नाहीत. त्यांनी याविषयी मुख्याध्यापक सलमान किडवई यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर किडवाई वर्गात आले आणि माझ्या भावाला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली, तसेच ‘राम राम’ म्हणू नकोस’, अशी धमकी दिली. यानंतर त्याला शाळेतून धक्के मारून बाहेर काढण्यात आले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडते, यातून धर्मांध मुसलमान किती उद्दाम आहेत, हे लक्षात येते ! अशा शाळांना आता टाळेच ठोकणे आवश्यक आहे ! |