Shoes Hurled at Kerala CM : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या वाहन ताफ्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेकली चप्पल !
अहिंसावादी काँग्रेसची हिंसात्मक कृती !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या वाहन ताफ्यावर काँग्रेस पक्षाच्या ‘केरळ विद्यार्थी संघा’च्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेकली. (काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचे कार्यकर्ते असे आहेत, तर प्रमुख कार्यकर्ते आणि नेते कसे असतील ?, हे यावरून लक्षात येते ! – संपादक) हा ताफा पेरुंबवूरहून कोठामंगलम् येथे जात होता. या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची चेतावणी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.