राज्यसभेतील खासदारांसाठीचा शुक्रवारच्या नमाजासाठीचा अर्धा घंटा रहित !
नवी देहली – संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी प्रत्येक शुक्रवारी दुपारी नमाजपठणासाठी मिळणारा अर्धा घंट्याचा वेळ रहित करण्याचा निर्णय राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी घेतला. लोकसभेत मात्र नमाजपठणासाठी अशा प्रकारे वेळ देण्यात येत नव्हता.
सौजन्य: Sansad TV
राज्यसभेच्या ८ डिसेंबरच्या कामकाजाला दुपारी २ वाजता आरंभ झाला. त्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे खासदार तिरूची शिवा यांनी विचारले की, प्रत्येक शुक्रवारी सभागृहाचे कामकाज दुपारी २.३० वाजता चालू होत होते. म्हणजे नमाजपठणानंतर हे कामकाज चालू व्हायचे. या वेळी मात्र कामकाजास दुपारी २ वाजता प्रारंभ करण्यात आला आहे. त्यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, यासंबंधीच्या नियमांतील पालट एक वर्षापूर्वी करण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कामामध्ये समानता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामुळात धर्मनिरपेक्ष देशात असा वेळ का देण्यात आला होता ?, हा प्रश्न आहे ! |