पू. अश्विनीताई, श्वासोच्छ्वासी तुझ्या गुरुतत्त्व वसे ।

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा कार्तिक कृष्ण एकादशी (८.१२.२०२३) या दिवशी ३४ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सौ. स्नेहा हाके (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी त्यांच्या (सौ. स्नेहा यांच्या) २५ व्या वाढदिवसाच्या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या चरणी अर्पण केलेले काव्यमय हृद्गत येथे दिले आहे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार
सौ. स्नेहा हाके

मी नसे समवेत जरी । कळे मनातील माझ्या तुला सर्वकाही ।
कसे हाताळावे, काय सांगावे । समजते केवळ तुलाच गं ताई (टीप १) ।। १ ।।

अशी ती ताई, जिला ठाऊक आहे सर्व काही ।
अनेक गुणांचा समुच्चय आहे जिच्या ठायी ।। २ ।।

मन असे विशाल, नसे त्यास मर्यादा ।
जणू सागराची अथांगता ।। ३ ।।

समोरचा चुकला जरी कितीही ।
त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे, हाच मनी संस्कार ।।
त्यातूनही होतसे त्याच्या ।
स्वभावदोष-अहं अन् प्रारब्ध यांवर प्रहार ।। ४ ।।

मन अन् बुद्धी यांची प्रगल्भता ।
त्यासह अव्यक्त भावाची मधुरता ।
प्रिय असे गुरूंना तुझी ही एकरूपता ।। ५ ।।

क्षेत्र असो कोणतेही । हातखंडा तर तुझाच असे ।
कारण श्वासोच्छ्वासी तुझ्या गुरुतत्त्व वसे ।। ६ ।।

गुरुतत्त्वाची दिव्यता न कळे आम्हा सामान्य जिवांना ।
तुझ्यातील महानता समजे केवळ श्री गुरूंना ।। ७ ।।

किती वर्णावी महती । जिथे शब्दही थिटे पडती ।।
तुझ्यातील अंतर्मुखता पाहून । कुंठित होई माझी मती ।। ८ ।।

येई प्रचीती तुझ्यातील गुरुतत्त्वाची ।
साद घाली ती सहज होऊन साधकजनांसी ।।
नसे मर्यादा वयाची ।
साथ केवळ श्रद्धा अन् भावभक्ती यांची ।। ९ ।।

हार तर कधीच नसे । समस्यांना तुझ्याकडे थारा नसे ।।
अभ्यास मात्र अत्यंत प्रिय असे ।
कारण निर्णयांचा उगम त्यातून होत असे ।। १० ।।

भासे कधी तू मला देवीसम । कधी आईसम ।।
तर कधी कठोर ताईसम । कधी गुरुमाऊलीरूपे ।। ११ ।।

ही सर्व रूपे तुझी । बाह्यतः भासणारी ।
मात्र माझ्यातील देवत्वालाच जागृत करणारी ।। १२ ।।

न कळे मला काही । परि तू देतच असे ।।
गुरुमाऊलीची कृपा माझ्यावर । तुझ्याचमुळे होत असे ।। १३ ।।

चुकते मी सततच, तू सांगतही असते ।
तरी अहं अन् स्वभावदोष यांच्या मायेत मी गुरफटते ।। १४ ।।

मायेत तर मी सततच अडकते ।
तरी मला जोरात खेचून तूच बाहेर आणतेस ।। १५ ।।

असते जेव्हा या स्थितीत कळत नाही तुझी प्रीती ।
तू खेचून बाहेर आणल्यावर समजते स्वतःची परिस्थिती ।। १६ ।।

तुझ्यातील निरपेक्ष प्रेम ।
गुरुमाऊलीसम निखळ प्रीती अनुभवते मी पू. ताई ।
अहंकारामुळे मात्र कृतज्ञताभाव मनात न राही ।। १७ ।।

पू. ताई, मला सतत तुझ्यासम भक्ती करता यावी ।
हीच आहे प्रार्थना तुझ्या ठायी ।। १८ ।।

मन हे व्हावे अर्पण गुरुचरणी । तेव्हाच समर्पणाचे मिळतील धडे ।
अन् उलगडेल जलद प्रगतीचे कोडे ।। १९ ।।

वाढदिवस आहे माझा जरी । तुला अर्पिण्या मजकडे काहीच नाही ।
तू उदार असल्याने मागते तुझ्याचकडे पू. ताई ।। २० ।।

क्षमा कर मला, चुकले माझे पुष्कळ काही ।
अन् मला समजलेही नाही ।
समजले आता जरी, वेळ आता राहिली नाही ।
क्षमेची ही प्रार्थना स्वीकारावी पू. ताई  ।। २१ ।।

‘पू. ताई, काहीही झाले, तरी तू मला कधीच सोडू नकोस. तू कधीच सोडणार नाहीस, सोडत नाहीस आणि आजवर सोडलेही नाहीस. मला तुझा क्षणोक्षणी लाभ करून घेता येऊ दे’, हीच तुझ्या कोमल चरणी आर्त प्रार्थना करते.’

टीप १ : सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार

– सौ. स्नेहा सचिन हाके (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.६.२०२१)