जळगाव येथील शिवमहापुराण कथेत चोरांचा धुमाकूळ : १० जणांच्या टोळीला अटक !
जळगाव – येथील बडे जटाधारी मंदिराजवळ ३ दिवसांपासून श्री शिवमहापुराण कथा चालू आहे. कथेला प्रतिदिन लाखो भाविकांची उपस्थिती आहे. या गर्दीचा अपलाभ घेत २ महिलांच्या सोन्याची पोत लांबवल्याची घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी पहिल्याच दिवशी महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता, तर दुसर्या दिवशीही पथकाने १० जणांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत. आता एकूण संशयितांची संख्या ३७ झाली आहे.
संपादकीय भूमिकाजनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने चोरीमध्ये सहभागी होणे दुर्दैवी ! |