पुलवामा येथील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आलमगीर याचे पाकिस्तानमध्ये अपहरण
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे हाफिजाबाद येथून अज्ञातांनी अपहरण केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स अल्जेब्रा’ने प्रसारित केले. वर्ष २०१९ मध्ये जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा आलमगीर मुख्य सूत्रधार आहे.
आलमगीर डेरा हाजी गुलाम येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होता. त्या वेळी त्याचे अपहरण करण्यात आले. पोलिसांना त्याची दुचाकी एका निर्जन स्थळी सापडली आहे.