द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी

…अशी झाली द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

२ डिसेंबर २०२३

उद्बोधन सत्र  १

  • महाराष्ट्र मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा
  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आणि संघटनाची आवश्यकता !
  • आशीर्वचनपर मार्गदर्शन : मंदिर संस्कृतीचे रक्षण, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे कर्तव्य !

उद्बोधन सत्र २

  • मंदिरांतील मूर्ती आणि मंदिरांची वास्तू घडवतांना घ्यावयाची दक्षता
  • मंदिरांचा जीर्णोद्धार करतांना घ्यावयाची दक्षता
  • मंदिर हे सनातन धर्माच्या प्रचाराचे केंद्र कसे बनवावे ?
  • परिसंवाद १ – मंदिर सुव्यवस्थापन
  • परिसंवाद २ – पुजार्‍यांच्या समस्या आणि उपाययोजना

३ डिसेंबर २०२३

उद्बोधन सत्र ३

  • मंदिर आणि ‘मिडिया मॅनेजमेंट’ (प्रसारमाध्यमांशी संबंध)
  • सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या संदर्भात कृती समिती बनवण्याचे महत्त्व !
  • धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरे यांचा समन्वय अन् कागदपत्रांचे ‘रेकॉर्ड किपिंग’ (नोंदी ठेवणे)
  • मंदिर विश्वस्त आणि पुरोहित प्रशिक्षण अभ्यासक्रम
  • मंदिरांमधील वस्त्रसंहिता अभियान आणि भावी दिशा

उद्बोधन सत्र ४

  • केंद्रीय पुरातत्व विभागाची भूमिका आणि मंदिर विकासात येणारे अडथळे
  • बाणगंगा तीर्थक्षेत्राच्या रक्षणासाठी दिलेला यशस्वी लढा !
  • येणार्‍या काळात मंदिर क्षेत्रात करावयाच्या संघटित कृती !

मान्यवरांचे विचार

धर्मशिक्षणाचे केंद्र असलेली ‘मंदिर संस्कृती’ निर्माण व्हायला हवी ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये

प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. आजही हिंदू सर्व भेद विसरून केवळ मंदिरात देवतेला शरण जातो. मंदिराच्या माध्यमातून समाजाला बांधून ठेवण्याची प्रक्रिया होते. जन्महिंदूंचे कर्महिंदूंमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य केवळ मंदिराच्या माध्यमातून होऊ शकते. मंदिरे ही केवळ ‘धर्मस्थळे’ नाहीत, तर ती एक ‘संस्कृती’ आहे. प्रत्येक मंदिर हे धर्मप्रसाराचे केंद्र व्हायला हवे.

मंदिरात हलाल उत्पादने किंवा त्यांचा प्रसाद नको ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे

मंदिरात येऊ घातलेला ‘हलाल जिहाद’ वेळीच हद्दपार करा ! पूजाविधीसाठी हलाल प्रमाणपत्र असलेला प्रसाद, तो बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य किंवा पूजाविषयक साहित्य वापरू नका ! अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहादच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उत्तरप्रदेशमध्ये हलालवर आलेली बंदी महाराष्ट्रातही त्वरित लागू व्हायला हवी !

अतिक्रमित मंदिरांची मुक्तता करणे, हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

‘काशी-मथुरा’ मुक्त करणे हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. पुनर्स्थापनेसाठी या देवता सनातन धर्मियांची वाट पहात आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. काशी विश्वेश्वर मंदिराच्या अष्टमंडपात सर्व हिंदू लवकरच पूजाविधी करू शकतील. श्रीकृष्ण जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमण हा आपला राष्ट्रीय प्रश्न आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात याविषयीचा खटला चालू आहे. ‘काशी-मथुरा’ मुक्त करून ते पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे.

आज धर्माला, तर उद्या मंदिरांना संपवण्याची भाषा होऊ शकते, हे जाणा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

चेतन राजहंस

आज सनातन धर्माला संपवण्याची भाषा होत असेल, तर यदा कदाचित् उद्या मंदिरांनाही संपवण्याचे भाष्य केले जाईल. देशभरातील पुरोगामी, शहरी नक्षलवादी आणि सनातन धर्मविरोधक चालवत असलेले सनातन धर्माला संपवण्याचे षड्यंत्र म्हणजे हिंदूंच्या ‘मास जेनोसाईड’चा (वंशविच्छेदचा) कटच आहे. अशांचा घटनात्मक विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करून सनातन धर्मरक्षणाचे पाऊल टाकूया !

जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा संदेश !

प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज

या परिषदेचे आयोजन ‘वर्तमान स्थितीमध्ये हिंदु धर्म संघटित करण्यासाठी मोलाचे कार्य करू शकेल’, असा आत्मविश्वास वाटतो. आमचे मंदिर, मठ, आश्रम हे संबंधित विश्वस्त किंवा भक्त यांच्या कह्यात दिले पाहिजेत. यासाठी सर्वच आध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा करावा अन् रचनात्मक, तसेच संघटनात्मक कार्य करून अन्यायाला वाचा फोडा. हे कार्य विस्तीर्ण होण्यासाठी यामध्ये भक्तगण, संप्रदाय, मंदिरांचे पुरोहित, विश्वस्त मंडळे, तसेच हिंदु धर्माचे हितचिंतक आदी मंडळींचे जनजागरण करून त्यांना या कार्याला जोडून घेतले पाहिजे.

१. भारतातील हिंदु मंदिरांचे पावित्र्य, संस्कार, संस्कृती, अध्यात्म कायम ठेवण्यासाठी वस्त्रसंहितेची (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) नितांत आवश्यकता आहे.

२. मंदिरांतील धर्मपरंपरा आणि प्राचीन धार्मिक संस्थान यांचे रक्षण करण्यासाठी, तसेच धर्मविरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी सर्वच ईश्वरप्रेमी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु बांधवांना धार्मिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आपल्या प्रथा-परंपरा, व्रत-वैकल्ये, सण इत्यादी गोष्टींमध्ये सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे ? याविषयीचे मार्गदर्शन धार्मिक शिक्षणातून देता आले पाहिजे.

३. ‘धर्माचे रक्षण ही काळाची आवश्यकता आहे’, हे ओळखून सर्व संप्रदाय, मठ, मंदिरे, आश्रम यांनी एकत्र येऊन हिंदु धर्माचे संवर्धन अन् जतन करावे. या संदेशाद्वारे मंदिर-न्यास परिषदेसाठी आमचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पाठवत आहोत.

ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांच्या अडचणी सोडवण्याचे एक सामूहिक व्यासपीठ सिद्ध झाले आहे !

– ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, पंढरपूर

श्री. ऋत्विक औरंगाबादकर

महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या माध्यमातून आम्ही वाळकेश्वर महादेव मंदिराची पुनर्स्थापना करू !

– श्री. ऋत्विक औरंगाबादकर, बाणगंगा तीर्थक्षेत्र टेम्पल, मुंबई

मंदिर-न्यास परिषदेतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या दिशादर्शनपर संदेशाचे वाचन !

२. नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संदेशाचे वाचन !

३. विघ्नहर गणपति मंदिराच्या (ओझर) संकेतस्थळाचे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हस्ते अनावरण !

४. लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांच्या ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन !

५. वर्ष २०२४ च्या ‘सनातन पंचाग’ (मराठी) च्या ‘अँड्रॉइड’ आणि ‘आय्.ओ.एस्.’ ॲप यांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण !

६. काशी विश्वेश्वर आणि मथुरा येथील मंदिरमुक्ती लढ्यातील योगदानाविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार !

उद्बोधन !

मंदिरातील पुजार्‍यांनी ‘आम्ही देव आणि भक्त यांतील दुवा आहोत’, असा भाव ठेवल्यास त्यांचे भाविकांच्या समवेतचे वर्तन चांगले राहील अन् भाविकांनाही दर्शनाने समाधान लाभेल !

– श्री. डिगंबर महाले, विश्वस्त, श्री मंगळग्रह मंदिर, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंची परंपरा आणि संस्कृती जतन केली जाते. पुढील काळात मंदिरांवरील इस्लामिक आक्रमणाचा प्रतिकार कसा करता येईल ? यासाठी आपल्याला ‘एकीचे बळ’ वाढवावे लागेल !

– श्री. बबनराव मांडे, विश्वस्त, विघ्नहर देवस्थान, ओझर

देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. मंदिरातील पूजाविधी शास्त्रानुसार कसा होईल, हे पुजार्‍यांनी पहायला हवे. धर्माचे स्थान मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवा !

– महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांचे महत्त्व भाविकांना समजून सांगायला हवे !

– श्री. अशोक घेगडे, व्यवस्थापक, श्री विघ्नहर देवस्थान, ओझर

हिंदु राष्ट्रातील एक आदर्श मंदिर म्हणून ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिराचा आदर्श घेता येईल !

– श्री. विष्णु शंकर जैन, अधिवक्ता, सर्वाेच्च न्यायालय