देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?
सभामंडपात प्रवेश करणे
१. सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम सभामंडपाच्या द्वाराला दुरून नमस्कार करावा.
२. सभामंडपाच्या पायऱ्या चढता चढता उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवावा .
३. सभामंडपात पाऊल टाकतांना प्रार्थना करावी, ‘हे देवते, तुझ्या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा मला पुरेपूर लाभ होऊ दे.’
सभामंडपातून गाभार्याकडे जाणे
सभामंडपाच्या डाव्या अंगाने चालत गाभार्यापर्यंत जावे.
देवतेचे दर्शन घेण्यापूर्वी करावयाच्या कृती
देवळातील घंटा शक्यतो वाजवू नये. वाजवायचीच असल्यास अतिशय लहान नाद होईल ‘जणूकाही घंटानादाने आपण देवाला जागृतच करत आहोत’, असा भाव ठेवून वाजवावी.
शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे. याला ‘शृंगदर्शन’ असे म्हणतात.
देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना करावयाच्या कृती
देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये, तसेच शिवालयात पिंडी अन् तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणार्या रेषेच्या अंगाला उभे रहावे.
देवतेचे दर्शन घेतांना पहिल्या टप्प्यात देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून, नतमस्तक होऊन ‘अहंचा लय व्हावा’, यासाठी देवतेला प्रार्थना करावी. दुस
देवतेचे दर्शन झाल्यानंतर करावयाच्या कृती
गर्भागारात असलेल्या आपल्या उजव्या हाताकडच्या द्वारातून बाहेर पडून अग्निदेवतेचे म्हणजे यज्ञकुंडाची स्थापना केलेल्या मंडपाचे (असल्यास) दर्शन घ्यावे.
पुन्हा गर्भागारात येऊन आपल्या डाव्या हाताकडच्या द्वारातून बाहेर पडून सूर्यनारायणाच्या मूर्तीचे (असल्यास) दर्शन घ्यावे. त्यानंतर गर्भागारात येऊन परत देवतेचे दर्शन घेऊन मग गर्भागाराच्या मुख्य द्वारातून बाहेर पडावे.
सर्वसाधारणतः गाभार्यात जायला प्रतिबंध (मनाई) असतो; परंतु काही देवळांत गाभार्यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्यात जातांना गाभार्याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्यात जावे.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’)