काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडून आतापर्यंत ३०० कोटी रूपयांहून अधिक रोकड जप्त
रांची (झारखंड) – आयकर विभागाकडून ६ डिसेंबरपासून काँग्रेसचे खासदार धीरज साहू आणि त्यांचे नातेवाईक अन् मित्र यांच्या ३ राज्यांतील १० हून अधिक ठिकाणांवर धाडी घातल्या जात आहेत. यात आतापर्यंत ३०० कोटी रुपयांहून अधिक रोकड सापडली असून अजूनही नोटांची मोजणी चालू आहे. ही रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. या नोटांची मोजणी करतांना आतापर्यंत नोटा मोजणारी ४ यंत्रे तुटली आहेत. यामुळे मोठे यंत्र मागवण्यात आले आहे. धीरज साहू हे मद्य निर्मिती आस्थापन ‘बलदेव साहू सन्स अँड ग्रुप’शी संबंधित आहेत. या आस्थापनाची ओडिशामध्ये २५० हून अधिक दारूची दुकाने आहेत. आयकर विभागाच्या धाडींनंतर या आस्थापनाच्या बोलंगीर जिल्ह्यातील ४२ दुकाने बंद करण्यात आली असून त्यामध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी, ‘आयकर विभाग त्यांना अटक करील आणि चौकशी करील’, या भीतीने पलायन केले आहे.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्ट खासदारांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर बंदी घाला ! |