बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणणारा बांगलादेशी घुसखोर अटकेत !
मुंबई – बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणून कामधंदा मिळवून देणारा अक्रम नूर नवी शेख (वय २६ वर्षे) याला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी आणि त्याचा साथीदार २० सहस्र रुपयांत बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या मुंबईत आणून नोकरी देत होता. भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात अवैधरित्या पाठवत होता.
अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात रहात होता. तो स्वतःही बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आला होता. येथे त्याने शफीक या साथीदाराचे साहाय्य घेतले होते. पोलिसांनी आरोपींकडून २ भ्रमणभाष, रोख रक्कम, तसेच कोलकाता ते मुंबईचे विमान तिकीट कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिकास्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे ! |