सरकारने गुरुकुलांचे कल्याण आणि संरक्षण सुनिश्चित केले पाहिजे ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये उपस्थितांना संबोधित करतांना सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी ‘गुरुकुल हे मदरशांसाठी प्रत्युत्तर का ठरू शकत नाही ?’, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘आपण ५ मदरशांचा ५ गुरुकुलांद्वारे प्रतिकार करू शकत नाही; कारण गुरुकुल द्वेष शिकवत नाहीत. याचे एक उदाहरण पाहू. आंब्याच्या झाडाशेजारी बाभळाचे झाड लावले, तर बाभळाचे झाड आंब्याच्या झाडाला मारून टाकते. आंब्याचे झाड मरू नये; म्हणून बाभळचे झाड काढून टाकणे, हे बागायतदाराचे (सरकारचे) कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने गुरुकुलांचे कल्याण आणि संरक्षण सुनिश्चित केले पाहिजे.’