नेदरलँड्सची मूळ संस्कृती आणि नागरिक यांचे रक्षण करणे, हे माझे प्रथम प्राधान्य ! – गीर्ट विल्डर्स

‘रिबेल न्यूज’चे वृत्तनिवेदक इर्झा लवांट यांनी अलीकडेच नेदरलँड्स संसदेच्या निवडणुकीत विजेते झालेले गीर्ट विल्डर्स यांची मुलाखत घेतली. विल्डर्स यांचा नेदरलँड्समध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान शरणार्थींच्या स्थलांतराला विरोध असल्याने अनेक वर्षे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यांची थट्टा केली; परंतु नेदरलँड्सच्या लोकांनी त्यांच्या पक्षाला सर्वाधिक मते दिली. विल्डर्स यांच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ पक्षाला संसदेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला. त्यामुळे आता ते नेदरलँड्सचे पंतप्रधान होतील, हे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीनंतर ‘रिबेल न्यूज’च्या रूपाने गिल्डर्स यांची पहिली आंतरराष्ट्रीय मुलाखत झाली. त्यांनी या मुलाखतीत सांगितलेली सूत्रे येथे देत आहोत.

गीर्ट विल्डर्स

१. गीर्ट विल्डर्स यांचा पक्ष आणि अन्य पक्ष यांच्यापुढे असलेला पेच !

संसदेची निवडणूक जिंकल्याचा मला आनंद आहे. मी या निवडणुकीत केवळ संसदेच्या जागा जिंकल्या नाहीत, तर नेदरलँड्सच्या नागरिकांतील ४ पैकी एकाने मला मत दिले आहे. माझ्यासाठी ही गोष्ट पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे. आता सरकार बनवण्यासाठी युती करण्यासाठी मी चांगला पक्ष शोधत आहे. ते करणे, हे आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागेल, असे मला वाटते; परंतु ज्या इतर पक्षांना मते मिळाली आहेत, त्यांपैकी ८० ते ९० टक्के लोकांना माझ्या पक्षासह काम करावे’, असे वाटत आहे.

आतापर्यंत इतर राजकीय पक्ष सरकार बनवण्यासाठी सिद्ध झाले असते; परंतु हे पक्ष पुढे येण्यास कचरत आहेत; कारण त्यांपैकी काही पक्ष निवडणुकीत हरले आहेत. त्यामुळे ‘राज्य कसे करणार ?’, असे त्यांना वाटते. इतर काही पक्षांना वाटते की, माझ्या पक्षाने इस्लामीकरणाच्या विरोधात मांडलेली काही सूत्रे नेदरलँड्सच्या राज्यघटनेला धरून नाहीत. मी मात्र युतीचे सरकार करण्याविषयी आशावादी आहे.

२. नेदरलँड्सला चांगले बनवण्याकडे कल !

माझा पक्ष विदेशातून होणारे स्थलांतर आणि इस्लामीकरण यांच्या विरोधात असून आम्हाला वाटते की, नेदरलँड्सने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावे. आम्हाला शरणार्थींचे स्थलांतर बंद करून त्यांना इतर देशांत पाठवायचे आहे. ‘नेदरलँड्सच्या लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा आभिमान असावा’, असे मला वाटते. आफ्रिका आणि इतर इस्लामी देशांना निधी देणे किंवा साहाय्य करणे, हवामान किंवा नायट्रोजनवर अधिक पैसे खर्च करणे, या साम्यवाद्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित ‘क्षुल्लक गोष्टी’ असून त्या बंद करण्यास मी प्राधान्य देणार आहे. कराची रक्कम न्यून करून लोकांना त्यांचे पैसे परत द्यावेत, रहाणीमानावर होणारा खर्च अल्प व्हावा आणि नेदरलँड्सच्या मूळ लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी आधार द्यावा, हा माझा उद्देश आहे.

३. इस्लामी राष्ट्रांकडून फतवे !

इस्रायल, अमेरिका आणि इतर देशांतील जागतिक नेत्यांनी माझे अभिनंदन केले आहे. मी जिंकल्यावरून संपूर्ण युरोपमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगातील लोकांना हे स्पष्ट माहिती आहे की, फ्रान्स, इटली, स्विडन, बेल्जियम आणि जर्मनी या श्रीमंत देशांतील सरकारे इस्लामीकरण कसे हाताळत आहेत ? सध्या देशभक्तीच्या चळवळीचे एक प्रकारे पुनरुज्जीवन होत आहे. त्याचा राजकीय स्तरावरही परिणाम होत आहे. प्रतिष्ठित समाजाकडे (‘इलिट क्लास’कडे) आता दुर्लक्ष केले पाहिजे आणि सर्वसाधारण जनता ते सिद्ध करून दाखवीत आहे.

मला उच्च दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे; कारण पाकिस्तान आणि अनेक अरब राष्ट्रे यांनी माझ्या विरोधात फतवा काढला आहे. मी सत्य आणि देशाविषयी बोलत असल्याने माझ्या विरोधात ५ फतवे काढले गेले आहेत. इतर राष्ट्रे मला ‘वर्णद्वेषी’ संबोधत आहेत; परंतु ‘देशाविषयी प्रेम असणे आणि देशाकरता काम करणे’, हे चुकीचे नाही. इतर राष्ट्रांनीही हे लक्षात घेऊन आणि स्वतः नेतृत्व करून आपला देश, त्याची संस्कृती आणि देशातील लोक यांचे रक्षण केले पाहिजे. या चळवळीला पाठिंबा जाहीर केला पाहिजे, असे मला वाटते. यामुळे अनेक प्रसिद्धीमाध्यमे माझा, तसेच नेदरलँड्स आणि मला निवडून दिलेल्या लोकांवर टीका करत आहेत.

४. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल यांच्याविषयी भूमिका

रशिया-युक्रेन युद्धाविषयी मला वाटते की, रशियाने चूक केली आहे. त्यामुळे नेदरलँड्सने त्या देशाला शस्त्रास्त्रे देणे बंद केले पाहिजे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाविषयी मला वाटते की, हे भूमीसाठी केलेले युद्ध नव्हे, तर तत्त्वासाठी चालू असलेले युद्ध आहे. इस्रायलने स्वतःची भूमी पॅलेस्टाईनला द्यायलाच नको होती. ‘समस्या सुटेल’, असे त्यांना वाटल्याने त्यांनी तसे केले; परंतु इस्लामी तत्त्वज्ञान हे मृत्यूला बोलावते. ज्यांना जगण्याविषयी प्रेम आहे, त्यांच्याविरुद्ध मृत्यूला पुकारणे त्यांना आवडते. माझा इस्रायलला पाठिंबा आहे.

५. प्रसिद्धीमाध्यमांविषयी विल्डर्स यांची भूमिका !

स्वतंत्र प्रसिद्धीमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या ‘सेन्सरशीप’विषयी मला वाटते की, सरकार, राजकीय पक्ष आणि संस्था यांना ठाऊक आहे की, जेव्हा विरोधक सत्य बोलतात, तेव्हा ते युक्तीवाद जिंकू शकत नाहीत. या प्रसिद्धीमाध्यमांनी प्रत्येक विषयावर मुक्त अशी भाषणे ठेवली पाहिजेत. सर्वसाधारण लोकांना दोन्ही बाजू ठाऊक असतात. आपल्याला जे वाटते, ते बोलू दिले जात नाही. लोक या स्वतंत्र प्रसिद्धीमाध्यमांची निवड करत आहेत आणि हे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढले आहे. १० वर्षे लढा दिल्यानंतर ‘पार्टी फॉर फ्रीडम’ने निवडणूक जिंकली आहे, ज्यामुळे इतर देशांमध्ये चांगल्या गोष्टी घडतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

निर्वासितांविषयी परखड धोरण !

मला असे वाटते की, वर्णद्वेषी म्हणून तुमच्यावर टीका होत असेल, तर घाबरू नका; कारण ते स्वाभाविक आहे. कोण कुणाविषयी भेदभाव करत आहे ? हे जाणून घ्या. आपण सत्य बोलून सरकार आणि इतर अधिकारी यांवर प्रभाव पाडला पाहिजे. विदेशी लोकांचे होणारे स्थलांतर किंवा निर्वासितांचे स्थलांतर याला पाठिंबा देऊ नका. लोकांना बोलण्यास उद्युक्त करा. तुमचा देश हा एखाद्या घराप्रमाणे असावा. तुमचा पाहुणा कोण आणि तो केव्हा देश सोडणार ? हे तुम्हाला माहिती हवे, तसेच हे स्वतःहून केले पाहिजे. आमच्याकडे याविषयी निर्णय घेण्यास युरोपियन युनियन आहे; परंतु कॅनडा हा युरोपीयन युनियनचा सदस्य नसल्याने तो स्वतःच निर्णय घेऊन अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणे देशाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

(साभार : कॅनडाची वृत्तवाहिनी ‘रिबेल न्यूज’)