आज ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन !

पुणे – डॉ. कर्नल अनिल आठल्ये (निवृत्त) यांनी लिहिलेले ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक ९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता सेनापती बापट रस्ता येथील भारतीय विद्याभवन जवळील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र येथे होणार आहे. भारतीय विद्या भवन आणि इंडस सोर्स बुक्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे. डॉक्टर कर्नल आठल्ये हे निवृत्त लष्करी अधिकारी असून संरक्षण मंत्रालयाच्या युद्ध अध्ययन विभागाचे माजी प्रमुख आहेत. युद्ध कौशल्यांच्या संदर्भात अलेक्झांडर याला ‘अलेक्झांडर द ग्रेट’ असे म्हणतात, तशीच महान कौशल्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याने हे पुस्तक लिहिल्याचे आठल्ये यांनी सांगितले.