राजीव दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० डिसेंबरला वेद खिल्लार गोशाळेत विशेष कार्यक्रम !
कोल्हापूर – स्व. राजीव दीक्षित यांच्या १३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १० डिसेंबरला शिरोळ तालुक्यातील वेद खिल्लार गोशाळा, निमशिरगाव येथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ७ ते १० नि:शुल्क स्वदेशी परामर्श आणि चिकित्सा करण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ती https://forms.gle/TNzCN4GLxKRU86i36 यावर करावी, तसेच अधिक माहितीसाठी सौ. प्राची मिरजे – ९४२३९१११३१ आणि कु. प्राजक्ता मोरे – ९११२९३११७७ यांना या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वैद्य गव्यार्षि श्री. नितेश ओझा आणि आयोजक यांनी केले आहे.
स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वाभिमानी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणारे वैज्ञानिक, स्वदेशी चळवळीचे प्रखर कार्यकर्ता-वक्ता, महर्षि वाग्भट रचित अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रहम, देशी गाय, नैसर्गिक शेती याचा प्रचार करणारे असे स्व. राजीव दीक्षित यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा कार्यक्रम होत आहे. यात सकाळी ७ वाजता कालभैरव यज्ञ, सकाळी ११.१५ ते दुपारी १.१५ गोपाल आणि शेतकरी यांच्यासाठी खुले सत्र, दुपारी २ ते ४ कृषी शिबिर, दुपारी ४.१५ ते सायंकाळी ५.१५ पंचगव्य नैसर्गिक चिकित्सकांचे (केवळ चिकित्सकांसाठी) मंथन सत्र असणार आहेत. या ठिकाणी सगळ्यात छोटी गाय ‘पंगनुरु’ पहाण्यासाठी मिळणार आहे.