‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ अश्लीलतेचा व्यापार अन् अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी करतात प्रवृत्त !
|
सांता फे (अमेरिका) – ‘मेटा’ या अमेरिकी आस्थापनाचे मालक मार्क झुकेरबर्ग यांच्याविरुद्ध येथील न्यू मेक्सिकोच्या राज्य सरकारनेच गुन्हा नोंदवला आहे. ‘मेटा’चे ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ ही सामाजिक माध्यमे मुलांसाठी सुरक्षित नाहीत. ती अश्लीलतेचा व्यापार करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रवृत्त करणारे प्रमुख व्यासपीठ बनले आहे, असा गंभीर आरोप राज्याचे अॅटर्नी जनरल राऊल टोरेज यांनी केला आहे.
टोरेज यांनी केलेले गंभीर दावे !
जर अल्पवयीन मुलांनी फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यांवर प्रसारित झालेला अश्लील मजकूर वाचण्यात रस दाखवला नाही, तरीही त्यांच्यापर्यंत प्रतिबंधित मजकूर पोचत आहे.
विज्ञापन महसुलावर परिणाम होण्याच्या शक्यतेने सुरक्षेचा अवलंब करण्यास ‘मेटा’ तयार नाही.
संपादकीय भूमिकाभारतातून नाही, तर अश्लीलतेचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील एक राज्य सरकारनेच आता अशा सामाजिक माध्यमांवर गुन्हा नोंद केला आहे. यातून या माध्यमांच्या अतिरेकी वापरावर आता भारताने योग्य पायबंद घालणे, हेच हितावह ठरणार आहे ! |