अल्पवयीन मुलाची हत्या करणारे दोघे अटकेत !
तरुण पिढीचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग चिंताजनक !
भिवंडी – येथे १६ वर्षीय योगेश शर्मा या मुलाची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना कह्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. आयुश विरेंद्र झा (वय १९ वर्षे), मनोज नारायण टोपे (वय १९ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी योगेशची धारदार हत्याराने वार करून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली.
संपादकीय भूमिकातरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि क्रूरता रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! |