नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !
मुंबई – मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटातील सदस्यांसमवेत बसले होते. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी नवाब मलिक सत्तेत सहभागी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी ‘ते शरद पवार यांच्या कि अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार ?’, याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही अजित पवार यांच्या कार्यालयात उपस्थित होते. यावरून नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याची चिन्हे दिसत आहेत.