मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता !
पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता. पहाणीनंतर तो पुन्हा भरला आहे; पण पुढील काही दिवस मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.