स्नानगृहातील तरुणीचे चित्रीकरण करणार्या कर्मचार्याला अटक !
शताब्दी रुग्णालयातील प्रकार !
मुंबई – येथील शताब्दी रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी अशोक गुप्ता याने स्नानगृहात अंघोळ करणार्या तरुणीचे चित्रीकरण केले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कर्मचार्याने भिंतीवर चढून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला. तेव्हा तो तेथून पळून गेला.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ? |