‘डीपफेक’द्वारे स्वतःची माहिती चोरी न होण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी ?
(टीप : ‘डीपफेक’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने छायाचित्रे आणि चित्रफिती यांमध्ये पालट करून एखाद्याचा चेहरा दुसर्या व्यक्तीच्या शरिरावर लावून ती वापरणे)
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अन् कतरिना कैफ यांच्याविषयी ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या झालेल्या वापरामुळे याविषयी कायदा असण्याची चर्चा चालू झाली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने छायाचित्रे आणि चित्रफिती यांमध्ये पालट करून एखाद्याचा चेहरा दुसर्या व्यक्तीच्या शरिरावर बसवून ‘डीपफेक’ सिद्ध केले जातात. हे डीपफेक ओळखणे कठीण आहे; परंतु शरिराच्या हालचाली आणि चेहर्यावरील हावभाव यांचे विश्लेषण करणे, तसेच त्याच्या पार्श्वभागात असलेल्या चुका शोधणे आणि ध्वनिफिती ऐकून त्यामधील उणिवा शोधणे यांमुळे डीपफेक ओळखण्यास साहाय्य होऊ शकते. सरकारने सामाजिक माध्यमांमध्ये काम करणार्या आस्थापनांना अशा प्रकारे पालट केलेली छायाचित्रे किंवा चित्रफिती त्वरित काढण्याची विनंती केली आहे. स्कार्लेट जोहान्सन आणि टॉम हॅन्क यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती ‘डीपफेक’च्या प्रकाराला फसल्या आहेत. तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग करण्यापासून सरंक्षण मिळण्यासाठी कायद्याची चौकट प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे.
‘डीपफेक’ला फसलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती१. अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन हिने तिचे नाव वापरणे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून तिचा आवाज वापरणे, यांच्या विरोधात एका कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीच्या ‘ॲप’वर कायदेशीर कारवाई केली आहे. २. टॉम हॅन्कस हेही फसले आहेत. दातांविषयीच्या एका विज्ञापनामध्ये त्यांचा वापर करण्यात आला. ३. अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या अनुमतीविना त्यांची ‘डीपफेक’ ध्वनीफीत प्रसिद्ध करणार्या संकेतस्थळावर खटला प्रविष्ट केला. ते त्या खटल्यात विजयी झाले. ४. वर्ष २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार अभिनेत्री करिना कपूर यांची पालट करण्यात आलेली चित्रफीत २० लाख लोकांनी पाहिली. ५. मॉडेल बेला हदीद यांची इस्रायलला पाठिंबा देणारी चित्रफीत ही ‘डीपफेक’नुसार केलेली होती. (साभार : दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संकेतस्थळ) |
१. डीपफेक म्हणजे काय? यामध्ये फसण्यापासून स्वतःला कसे वाचवू शकता ?
कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी तज्ञ असलेले श्री. अमेय जठार यांचे म्हणणे आहे, ‘‘डीपफेक हे उत्पादनक्षम असून त्यामध्ये असलेले डीप तंत्रज्ञानाचे नमुने वापरून आपण एखाद्या छायाचित्रामध्ये आपल्याला हवे तसे पालट करून ते छायाचित्र मूळ छायाचित्राप्रमाणे दिसेल असे करू शकतो. चित्रफितीच्या संकलनांमध्ये डीपफेकचा अधिक प्रमाणात वापर केला जात असून त्यामध्ये एखाद्या माणसाचा चेहरा दुसर्या माणसाच्या शरिरावर लावला जातो.’’
‘डीपफेक’ हे ध्वनिफीत आणि छायाचित्रे यांमध्येही सिद्ध करता येते. ध्वनिफितीमधील बोलण्यामध्ये पालट किंवा पूर्ण संभाषणामध्ये पालट रू शकतो. जर तुम्ही ‘गेम्स ऑफ थॉर्नस’मधील या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या शेवटी किट हॅरिंग्टन अका जॉन स्नो यांनी क्षमा मागितल्याविषयीच्या चित्रफितीवर विश्वास ठेवला असेल, तर तुम्ही ‘डीपफेक’मधील चित्रफित पहात होता, हे लक्षात घ्या.
२. ‘डीपफेक’ कसे ओळखता येते ?
२ अ. सायबर सुरक्षेतील तज्ञ डॉ. निरंजन रेड्डी यांनी अनुभवी नसलेल्या लोकांच्या लक्षात येणार नाहीत, असे काही भेद सांगितले आहेत. ‘डीपफेक’विषयी या काही गोष्टी तुम्ही पाहू शकता.
१. शरीर आणि चेहरा यांच्या हालचालींचे निरीक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ पापण्यांची उघडझाप वगैरे.
२. छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर काय आहे ? त्यामधील त्रुटी शोधा.
३. ध्वनीविषयीच्या काय त्रुटी आहेत ? किंवा आवाजात अगदी अल्प प्रमाणात पालट आहे, तर तो ऐका.
४. दाखवलेल्या छायाचित्राविषयी ‘इमेज रिर्व्हसल टूल’ ही संगणकीय प्रणाली वापरून ते छायाचित्र इंटरनेटवर कुठे आहे का ? हे पडताळावे. ‘मेटा’, ‘गूगल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ ही आस्थापने आता ‘डीपफेक’ ओळखण्याविषयीची साधने सिद्ध करत आहेत.
५. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ‘डीपफेक’च्या विरोधात त्वरित कृती करण्यासाठी सायबर गुन्हे तज्ञांना संपर्क करा.
२ आ. श्री. अमेय जठार यांचे म्हणणे आहे की, ‘डीपफेक’ ओळखणे, हे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे निर्माण केलेले लिखाण ओळखण्याएवढेच आव्हानात्मक आहे. ‘डीपफेक’ ओळखण्यासाठी काही मॉडेल्स सिद्ध केली आहेत; परंतु त्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे एखादे छायाचित्र किंवा ध्वनिफित ‘डीपफेक’ आहे, हे पडताळण्यासाठी माहितीचे अनेक स्रोत पहावे लागतील.
३. स्वतःची माहिती किंवा ओळख यांची चोरी होण्यापासून स्वतःला कसे वाचवावे ?
याविषयी डॉ. निरंजन रेड्डी सांगतात, ‘‘इंटरनेटवरील कोणतीही माहिती ही सुरक्षित आहे, हे सत्य नाही. सामाजिक माध्यमांवरील ‘ॲप’ (प्रणाली) ‘तुमची छायाचित्रे तुमच्या खात्यात सुरक्षित ठेवत आहेत’, असा आपला समज असतो; परंतु तुमची माहिती ते काढू शकतात आणि ती कुठे ठेवलेली आहे ? हे तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यामुळे सर्वांत सोपी युक्ती, म्हणजे तुमची व्यक्तीगत माहिती सर्वांत अल्प प्रमाणात दुसर्याला सांगावी. जी व्यक्ती माध्यमांवर सतत ‘ऑनलाईन’ असते, तिला अधिक प्रमाणात कृत्रिम बुद्धीमत्तेचा धोका असतो. दुर्दैवाने महिला अधिक प्रमाणात ‘डीपफेक’च्या लक्ष्य असतात. जेव्हा ‘ऑनलाईन’ मैत्री किंवा नाते बिघडते, तेव्हा एखाद्या व्यक्तीचा छळ करणे किंवा तिला भीती दाखवणे, यांसाठी डीपफेकचा वापर होऊ शकतो.’’
४. कायदेविषयक दृष्टीकोन
४ अ. श्री. अमेय जठार यांचे म्हणणे आहे, ‘‘सध्या कायदा, नैतिकता आणि बुद्धीमत्तेची मालकी यांच्यासंबंधी ‘डीपफेक’विषयी अस्पष्टता आहे. ‘डीपफेक’विषयीच्या काळजीपासून एखाद्या व्यक्तीचे संरक्षण करण्याविषयी कोणतेही प्रावधान नाही; परंतु जर ‘डीपफेक’चा वापर केल्याने एखाद्याच्या ओळखीला हानी पोचत असेल किंवा तिची सामाजिक दृष्टीने हानी होत असेल, तर मानहानी होणे किंवा चुकीची माहिती देणे यांविषयीच्या कायद्याखाली कारवाई होऊ शकते.’’
४ आ. डॉ. निरंजन यांचे म्हणणे आहे, ‘‘तरीही एखादी व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार तक्रार नोंदवू शकते, ज्यामुळे अश्लील माहिती प्रसिद्ध होण्यापासून संरक्षण होऊ शकते, तसेच तुम्ही जवळच्या सायबर गुन्हे विभागाकडे जाऊन तक्रार नोंदवू शकता.’’
५. डीपफेकविषयी सरकारचे म्हणणे
अशा पालटलेल्या माहितीविषयी ‘इलेक्ट्रॉनिक्स अन् माहिती आणि तंत्रज्ञान खात्या’ने सामाजिक माध्यमांना म्हटले आहे, ‘‘जेव्हा अशा डीपफेकविषयीच्या माहितीविषयी कळेल, तेव्हा पुढील ३६ घंट्यांमध्ये ती माहिती काढावी. माहिती आणि तंत्रज्ञानाविषयीच्या २०२१ च्या नियमांनुसार त्वरित कारवाई करावी.’’
(साभार : दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संकेतस्थळ)