दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ८ डिसेंबर ते १५ जून या कालावधीत आठवड्यातील १ दिवस पाणी बंद; धर्मांधाने हिंदु तरुणीला भोसकले !…
८ डिसेंबर ते १५ जून या कालावधीत आठवड्यातील १ दिवस पाणी बंद
पनवेल महानगरपालिकेचा निर्णय !
पनवेल – पनवेलकरांसाठी जून २०२४ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा; म्हणून पनवेल महानगरपालिकेने ८ डिसेंबर ते १५ जून या कालावधीत आठवड्यातील १ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेलकरांना यापुढील ७ मास पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.
धर्मांधाने हिंदु तरुणीला भोसकले !
नेरूळ (नवी मुंबई) – येथील एका बस थांब्यावर बसची वाट पहाणार्या एका हिंदु तरुणीवर हुसेन इमाम हसन शमशु याने जीवघेणे आक्रमण केले. तिच्या डोक्यावर बाटलीने वार केल्यानंतर फुटलेली बाटली तिच्या पोटात भोसकण्याचा त्याने प्रयत्न केला. यात ती पुष्कळ घायाळ झाली. (हिंदु तरुणींनो, यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिका ! – संपादक) तिच्यावर सध्या उपचार चालू असून हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना आजन्म कारागृहात डांबायला हवे ! |
न्यायालयाने सांगितल्यावरच कृती करणार का ?
आगीच्या घटनांवरून उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले !
मुंबई – अग्नीसुरक्षा नियमांच्या कार्यवाहींच्या शिफारशींच्या अहवालावर ६ मास होऊनही निर्णय घेतलेला नाही. न्यायालयाने सांगितल्यावरच सरकार कृती करणार का ? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. ‘सरकारने काय करावे, हे सांगणे न्यायालयाचे काम नाही’, असे खडेबोल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठाने सुनावले. ‘निर्णयास झालेल्या विलंबाचे कारण आणि प्रक्रिया कधी पूर्ण करणार, याचे स्पष्टीकरण नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावे’, असे आदेश न्यायालयाने दिले. अग्नीसुरक्षा नियमांच्या कार्यवाहीसंदर्भात सरकारची भूमिका उदासीन आहे.
कोट्यवधींची फसवणूक करणार्या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद !
पुणे – भूमीच्या खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने ६ जणांची १ कोटी १२ लाख ६० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य डॉ. पराग पवार यांच्यासह गणेश गुंड, महादेव ढोपे, रवींद्र वाडकर आणि अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘भूमीच्या मूल्यानुसार दरमहा भाडे देण्यात येईल, तसेच कायदेशीर गोष्टींच्या पूर्ततेनंतर जागा नावावर केली जाईल’, असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाअशांकडून हे सर्व पैसे वसूल करायला हवेत ! |