वेस्ट इंडिजमधील गुयाना येथे व्हेनेझुएला देश तेल आणि गॅस यांसाठी उत्खनन करणार असल्याने बहुसंख्य हिंदूंवर होणार परिणाम !
हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न !
गुयाना (जॉर्जटाऊन) – दक्षिण अमेरिकेजवळ क्रिकेटचा संघ असणार्या वेस्ट इंडिजमधील बेटांचा एक छोटासा देश असलेला गुयानामध्ये हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे; मात्र आता या देशाच्या भूमीवर शेजारी व्हेनेझुएला देश तेल आणि गॅस यांसाठी उत्खनन करण्याचा प्रयत्न करत असल्याने संकट निर्माण झाले आहे. व्हेनेझुएलाकडून हिंदूंची भूमी हडपण्याच्या शक्यतेमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१. गुयानामधील एस्सेकिबो या भागावर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांनी देशातील सरकारी स्वामित्व असलेल्या आस्थापनांना तेल, गॅस आणि खाणी यांचा शोध अन् उत्खनन त्वरित चालू करण्याचा आदेश दिला आहे.
२. गुयानामध्ये दोन ते अडीच लाख हिंदू रहातात. वर्ष २०१२ च्या आकडेवारीनुसार एस्सेकिबोमधील अनुमाने ३७ टक्के लोकसंख्या हिंदु आहे. ते धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी यज्ञ करतात. आता या भागावर नियंत्रण करण्याच्या व्हेनेझुएलाच्या प्रयत्नांमुळे येथील हिंदूंवर काय परिणाम होईल ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’च्या एका पोस्टनुसार गुयानातील हिंदु अनेक आव्हानांचा सामना करून त्यांच्या प्रथा आणि परंपरा चालू ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
संपादकीय भूमिकाभारताने या हिंदूंच्या साहाय्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेच देशातील हिंदूंना वाटते ! |