(म्हणे) ‘हिंदूंच्या मंदिरात हत्या आणि मुलींवर बलात्कार होत असल्याने तेथे जाणे बंद करा !’ – आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम
देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांचे हिंदुविरोधी विधान !
नवी देहली – तुमची हानी होईल, अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही मला सांगा की, जर एखाद्या मंदिरात गेल्यामुळे आपल्या लोकांची हत्या होत असेल, मूर्तीला स्पर्श केल्याने आपल्या तरुणांची हत्या होत असेल, तर तुम्ही अशा ठिकाणी का जाता, जेथे तुमचा अपमान होतो ? तुमच्या मुली, बहिणी यांच्यावर बलात्कार होतो, हत्या होते, त्या ठिकाणी जाणे बंद करावे, असे विधान देहलीतील आम आदम पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ३० सेकंदांचा हा व्हिडिओ हरियाणाच्या सोनीपत येथील लहराडा गावातील एका कार्यक्रमात राजेंद्र पाल गौतम बोलत असतांनाचा आहे.
केजरीवाल राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातून काढून का टाकत नाहीत ? – भाजप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, स्वतःला कट्टर हनुमानभक्त म्हणवून घेणारे देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सातत्याने हिंदु धर्मावर गरळओक करणारे राजेंद्र पाल गौतम यांना पक्षातून काढून का टाकत नाहीत?
“मंदिरों में जाना बंद करो”
“मंदिरों में महिलाओं के साथ दुष्कर्म होता है”
“मंदिरों में दलितों को मारा जाता है”
आप विधायक राजेंद्र पाल गौतम ने एक बार फिर मंदिरों और हिंदुओं को गाली दी
इससे पहले, 10,000 लोगों के सामूहिक धर्मांतरण के दौरान, वह लोगों को हिंदू धर्म और हिंदू देवताओं… pic.twitter.com/4HVkBTnGEp
— Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (@gauravbhatiabjp) December 6, 2023
हिंदु धर्मविरोधी कार्यक्रमात सहभागी झाल्याने राजेंद्र पाल गौतम यांचे गेले होते मंत्रीपद !
राजेंद्र पाल गौतम यांनी यापूर्वी अनेकदा हिंदु धर्मावर टीका केली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी हिंदुविरोधी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले होते. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंचे बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली होती की, भगवान बुद्ध श्रीविष्णूचे अवतार आहेत, हे मी मानणार नाही. मी याला केवळ वेडेपणा आणि खोटा प्रचार मानेन. मी श्राद्ध करणार नाही आणि पिंडदानही करणार नाही. ब्राह्मणांच्या कोणत्याही कार्यक्रमाला अनुमती देणार नाही. मी हिंदु धर्माचा त्याग करत आहे; कारण तो मानवतेला हानीकारक आणि विकासासाठी बाधक आहे. तो असमानतेवर आधारित आहे. मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये राजेंद्र पाल गौतम यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला मुलाखत देतांना म्हटले होते, ‘या देशात ११० कोटी लोक अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील आहेत. ते सर्व येत्या ५-६ वर्षांमध्ये बौद्ध धर्म स्वीकारतील त्यानंतर पाहू कि कोण बहुसंख्य होतात ?’
संपादकीय भूमिका
|