‘महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद आहे !’- पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज, इंदूर, मध्यप्रदेश

पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज

फोंडा, ७ डिसेंबर (वार्ता.) – महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज यांची ३ डिसेंबर २०२३ या दिवशी भेट घेतली. या वेळी त्यांनी ‘माझे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्याला आशीर्वाद आहेत’, असे सांगितले.
या वेळी कु. तेजल पात्रीकर यांनी महाराजांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संगीत विषयक संशोधन कार्याची माहिती सांगीतली. तेव्हा त्यांनी कार्य आवडल्याचे सांगून प्रशंसा केली. गोवा येथे ३५ व्या स्वरसाम्राज्ञी गिरीजाताई केळकर संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या गायनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराज येथे आले होते. या वेळी महर्षि आध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे आणि सौ. नीता सोलंकी उपस्थित होत्या.

पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज यांचा परिचय

पद्मभूषण डॉ. पं. गोकुळोत्सव महाराज हे मध्यप्रदेशातील इंदूर येथील असून ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. ते ख्याल, धृपद, धमार, प्रबंध गायकी आणि इतर विविध प्राचीन भारतीय संगीत शैलींमध्ये तज्ञ आहेत. त्यांना शासनाच्या पद्मश्री, पद्मभूषण आणि अन्य विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.