राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक

मुंबई – मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर कारागृहाबाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूला बसले होते. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी नवाब मलिक सत्तेत सहभागी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर शरद पवार यांच्या कि अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार, हे नवाब मलिक यांनी अधिकृतरित्या घोषित केलेले नाही; मात्र ७ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेले नवाब मलिक सभागृहात अजित पवार यांच्या बाजूच्या गटात बसले होते, तसेच सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही अजित पवार कार्यालयात उपस्थित होते. यावरून नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याची चिन्हे दिसत आहेत.