पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणणे बंद करावे !
|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणणे बंद करावे लागेल. त्यांनी फुटीरतावाद आणि प्रादेशिकता यांची आग भडकावण्याचा प्रयत्न करू नये. या कृतीमुळे देशाची एकता आणि अखंडता यांना धोका पोचवला जात आहे. त्यामुळे ही राज्यघटनाविरोधी कृती आहे, अशी टीका केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केली. केरळमध्ये साम्यवाद्यांकडून चालवण्यात येणार्या लेफ्ट डेमोक्रॅटिक प्रंट आघाडीचे आमदार के.टी. जलील यांनी फेसबुक पोस्टमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे वर्णन ‘आझाद काश्मीर’ असे केले होते; मात्र नंतर त्यांनी ती पोस्ट हटवली होती. रा.स्व. संघाच्या स्थानिक नेत्याने याविषयी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर के.टी. जलील यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकासाम्यवादी हे नेहमीच फुटीरतावाद पोसतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी साम्यवाद हद्दपार करणे आवश्यक ! |