‘खोके सरकार ४२०’ असल्याची विरोधकांची विधीमंडळाच्या बाहेर घोषणाबाजी !
नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – ‘खोके सरकार ४२०’च्या घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचा निषेध केला. या वेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गळ्यात संत्र, पोफळ यांच्या माळा घातल्या होत्या. आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.