सुविचार
राज्याभिषेक असो अथवा वनात जायचे असो, ज्यांच्या मनात जराही फरक पडत नाही; ज्यांचे मन जराही भ्रमित होत नाही, अशा लोकांना ‘प्रशांत’ म्हणतात. वाचलेले पुन्हा वाचणे, केलेले पुन्हा करणे, बोललेले पुन्हा बोलणे, ऐकलेले पुन्हा ऐकणे यालाच ‘अभ्यास’ म्हणतात. अशाश्वत गोष्टींच्या प्राप्तीसाठी माणूस शाश्वत असलेल्या तत्त्वाकडे मागणी करतो याला ‘जीवन विकास’ म्हणता येणार नाही.