शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देण्याच्या आमिषाने ५३ पालकांची फसवणूक !
शाळेतील लेखापालाविरोधात गुन्हा नोंद !
पुणे – नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायदा कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने शाळेतील लेखापालने ५३ पालकांकडून पैसे घेतले आहेत. पालकांची १३ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी लेखापालविरोधात गुन्हा नोंद केला आहे. शाळेचे साहाय्यक व्यवस्थापक स्वानंद कुलकर्णी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली. पालकांनी एप्रिलमध्ये प्रवेशासाठी पैसे दिले; मात्र त्यानंतर प्रवेश न मिळाल्याने पालकांनी लेखापालांकडे विचारणा केली, तसेच शाळेच्या प्रशासनाकडेही तक्रार नोंदवली. त्यामुळे लेखापाल विनयकुमार भांडारकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकापोलिसांनी फसवणूक केलेली सर्व रक्कम लेखापालाकडून वसूल करून त्याला कठोर शिक्षा करावी ! |