कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या मिरज येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे) !

कार्तिक कृष्ण दशमी (७.१२.२०२३) या दिवशी मिरज येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. अंजली अजय जोशी यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. अंजली जोशी

सौ. अंजली अजय जोशी यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. समाजातील पीडित स्त्रीला तळमळीने साहाय्य करणे

‘आम्ही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू करण्यापूर्वी चंदननगर (पुणे) येथे रहात होतो. तिथे एका स्त्रीला तिचे सासू-सासरे आणि पती छळत असत. हे सौ. अंजलीच्या लक्षात आल्यावर ती त्या स्त्रीला पोलीस ठाण्यात घेऊन गेली आणि तिने तिच्या पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रसंगामुळे त्या स्त्रीच्या पतीला पुष्कळ राग आला आणि त्यांनी अंजलीला ‘पाहून घेईन’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्या स्त्रीचा पती तिला आणखी त्रास देऊ लागला. तेव्हा अंजली तिच्या मैत्रिणीला घेऊन एका प्रतिष्ठित समाजसेविकेकडे गेली आणि तिने त्या पीडित स्त्रीला साहाय्य केले.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

२. शारीरिक त्रास होत असतांनाही ‘कुणी साहाय्य करावे’, अशी अंजलीची अपेक्षा नसते.

३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

अंजलीला कितीही महत्त्वाची सेवा असली, तरी ती स्वयंसूचनांची सत्रे काटेकोरपणे करते. ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न प्रामाणिकपणे करते.

४. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे

अंजली कितीही व्यस्त असली, तरी तिचे मुलींकडे (सौ. प्रियांका चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि कु. मैथिली यांच्याकडे) पूर्ण लक्ष असते. सौ. प्रियांका आणि मैथिली दोघीही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. अंजली मिरज येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करते. ती गोवा येथील घरी आल्यावर मुलींचे आश्रमातून घरी येणे होतेच, असे नाही; पण तरीही तिला मुलींकडून कोणत्याही अपेक्षा नसतात. ‘त्या दोघी गुरुसेवेत आहेत आणि त्यांनी सेवेतच रहावे’, असे तिला वाटते. तिने केलेल्या साहाय्यामुळेच मी कुटुंबियांत अडकून पडलो नाही. मला माझे लक्ष साधनेवर केंद्रित करता येत आहे.’

– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (१४.११.२०२३)