चैतन्यदायी भक्तीसत्संगाच्या वेळी श्री. सोमनाथ मल्ल्या यांना आलेल्या अनुभूती
१. भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मन शांत होऊन आतून ‘ॐ नमो नारायणा’, असा अखंड नामजप चालू होणे आणि डोळ्यांतून भावाश्रू वहाणे
‘एका भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘दोन मिनिटे डोळे मिटून आपत्काळाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. भूकंपासारखी परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे. अशा वेळी ‘आपल्या मनाची स्थिती कशी असते ?’, याचा अनुभव घेऊया.’ त्या वेळी माझे मन शांत होते आणि आतून ‘ॐ नमो नारायणा’, असा अखंड नामजप चालू होता. माझ्या मनात भीती किंवा काळजी असे काहीच नव्हते. मला आनंद वाटत होता. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.
२. सत्संगात ‘भूदेवीला प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करायला हवी’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यावर स्वतः श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सूक्ष्मातून प्रदक्षिणा घालणे, तेव्हा त्यांच्यावर ‘देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवणे
भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘भूदेवीला प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करायला हवी’, असे सांगितले. त्या वेळी श्रीमन्नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला पृथ्वीचे पालक असणार्या शंकर आणि पार्वती यांना प्रदक्षिणा घालणारा गणपति आठवला. मीसुद्धा साक्षात् भूदेवी असणार्या (महर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘भूदेवी’ असे संबोधले आहे. – संकलक) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सूक्ष्मातून प्रदक्षिणा घातली. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून वहाणारे भावाश्रू त्यांच्या चरणकमलांवर पडले. तेव्हा ‘भूदेवीला प्रार्थना करत असलेल्या स्वयं श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर (भूदेवीवर) देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले.
या दैवी अनुभूती दिल्या; म्हणून श्रीमन्नारायण आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी मी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सोमनाथ मल्ल्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|