आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण ! – संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

मुंबई – राज्यातील आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणा याविषयी कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे; पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. ही प्रकरणे पुराव्यांसह आली आहेत. या उद्योगाचे ‘संचालक’ संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी याविषयी पत्र लिहिले आहे.

राऊत पुढे म्हणाले की, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारीही त्यास उत्तरदायी आहेत. या विभागात केवळ पैसाच बोलतो आणि पैसाच काम करतोे.