विशेष न्यायालय स्थापन करण्याचा कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आदेश !
गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येचे प्रकरण
बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
७७ वर्षीय कलबुर्गी यांची ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांच्या धारवाड येथील निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वर्ष २०१९ मध्ये आरोपपत्र सादर करण्यात आले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात चालू आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जुलै २०२२ पासून या खटल्याची सुनावणी न्यायालयात चालू आहे.