बिहारमधील अॅक्सिस बँकेत १५ मिनिटांत १५ लाख रुपयांचा दरोडा !
सशस्त्र १५० पोलीस येण्यापूर्वीच दरोडेखोरांचे पलायन
भोजपूर (बिहार) – येथील अॅक्सिस बँकेत १५ लाख रुपयांचा दरोडा घालण्यात आला. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ आरोपी ग्राहक असल्याचे भासवत बँकेत घुसले आणि त्यांनी बँकेचा दरवाजा बंद केला आणि बँकेच्या १२ कर्मचार्यांना ओलीस ठेवले. या काळात एका कर्मचार्याने आपत्कालीन घंटा (सायरन) वाजवली. त्यानंतर १५ मिनिटांनी पोलीस बँकेत पोचले; मात्र तत्पूर्वी दरोडखोरांनी बँकेतील १५ लाख रुपये लुटून पलायन केले. विशेष म्हणजे १५० हून अधिक पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी बँकेला घेराव घातला. त्यांनी दरोडेखोरांना शरण येण्याचेही आवाहन केले; मात्र पोलीस येण्याच्या १ मिनिटांपूर्वीच दरोडेखोरांनी पलायन केले होते.
संपादकीय भूमिकापोलिसांपेक्षा अधिक चपळ असणारे दरोडेखोर ! अशा पोलिसांकडून गुन्हे कसे रोखले जाणार ? |