काश्मीर विधानसभेत काश्मिरी हिंदूंसाठी २, तर पाकव्याप्त काश्मिरींसाठी १ जागा नामनिर्देशित करणारी २ विधेयक संसदेत सादर !
नवी देहली – लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या विधानसभेत विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी २ जागा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित लोकांसाठी १ जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद करणारी २ विधेयक मांडली. काश्मीरसाठीच्या २ जागांमध्ये एक महिला असणे अनिवार्य असणार आहे. याखेरीज राज्यातील ९० सदस्यीय विधानसभेत अनुसूचित जातीसाठी ९ जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
Speaking in the Lok Sabha on two landmark bills related to the Jammu and Kashmir. https://t.co/w4PqoAsiZX
— Amit Shah (@AmitShah) December 6, 2023
संपादकीय भूमिकायासह काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सुरक्षित पुनर्वसन करणेही अपेक्षित आहे ! |