शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे आणि माहिती लावून केला जात आहे सन्मान !
प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक
नवी देहली – कोलकाता येथून सुटणार्या शताब्दी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये खिडक्यांच्या बाजूला स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. छायाचित्रांच्या बाजूला संबंधित स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सहजगत्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहिती मिळत आहे. या डब्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद, खुदीराम बोस, मादाम कामा, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आदींची छायाचित्रे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे प्रवाशांसमवेत असलेल्या लहान मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने चालू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
संपादकीय भूमिकासरकारने केवळ शताब्दी एक्सप्रेस पुरते मर्यादित न रहाता अन्य रेल्वे गाड्यांसह अन्य सार्वजनिक ठिकाणीही असा प्रयत्न केला, तर अधिकाधिक लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होण्यास साहाय्य होईल ! |