(म्हणे) ‘१३ डिसेंबरला भारतीय संसदेवर आक्रमण करणार !’ – गुरपतवंतसिंह पन्नू, खलिस्तानी आतंकवादी
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याची अमेरिकेतून धमकी !
नवी देहली – ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने अमेरिकेतून धमकी दिली आहे. ‘येत्या १३ डिसेंबरला भारताच्या संसदेवर आक्रमण करण्यात येईल’, असे त्याने म्हटले आहे. १३ डिसेंबर २००१ या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी संसदेवर आक्रमण केले होते. या वेळी सर्व आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर कटाचा मुख्य सूत्रधार महंमद अफझल याला फाशी देण्यात आली होती. पन्नू याने धमकीचा व्हिडिओ प्रसारित करतांना बाजूला महंमद अफझल याचे छायाचित्र ठेवल्याचे दिसत आहे.
सौजन्य विऑन
संपादकीय भूमिकाजगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची उघड धमकी अमेरिकेचा नागरिक असणारा पन्नू देतो आणि अमेरिका त्याकडे निष्क्रीयपणे पहाते अन् वर पन्नू याला ठार करण्याचा कथित कट रचल्यावरून भारतीय नागरिकालाच अटक करते, हा अमेरिकाचा दुटप्पीपणाच नव्हे, तर भारताशी केलेला विश्वासघात आहे ! |